छत्रपती संभाजीनगर : असदुद्दीन ओवैशी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवैशी?
ओवैशी यांनी म्हटले, "मोदी एकदा निवडणूक हारले तर पुन्हा निवडणूक लढणार नाही, पण आम्ही हारून सुध्दा पुन्हा जिंकण्यासाठी उभे आहोत." ते पुढे म्हणाले की, "ज्यांना वाटेल की 132 जिंकून महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व आहे, त्यांना संविधानाने चालावं लागेल."
ओवैशी यांनी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आणि भाजपाला आव्हान दिले, "महाराष्ट्रात भाजपाने बऱ्याच घोषणा केल्या, त्या पूर्ण कराव्या लागेल. पण राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे."
त्यांनी २०११-१२ च्या काळाचा उल्लेख करत म्हटले, "त्या वेळी आपली परिस्थिती अशीच होती, पण आज आपली ताकद आहे. हार मानण्याचे कारण नाही, राजकारणात चढ-उतार होतात." ओवैशी यांनी आपला उत्साह व्यक्त करत सांगितले, "दाढी पांढरी झाली, पण दिल अजून जवान आहे. हिम्मत हारू नका, पुन्हा जिंकू."
त्यांनी सांगितले की, "आपल्या पक्षाच्या नुकसानाचा मुख्य कारण विरोधक नाही, तर आपल्या लोकांकडून मिळत आहे." तसेच, "संभाजीनगरमधून सोडून गेलेल्यांना पुन्हा पार्टीत घेतले जाणार नाही कारण त्यांनी मोठा धोका दिला."
अखेर ओवैशी यांनी भाजपावर गंभीर आरोप करत सांगितले, "महानगर निवडणुकीत आपलं ताकदीने उभे राहू. लोक म्हणेल ते उमेदवार देऊ. आम्ही काम करून जिंकलो नाही, तर भाजपाने काही फक्त नारे देऊन जिंकले."