Thursday, September 12, 2024 12:06:23 PM

Ashish shelar interview
आशिष शेलार विशेष मुलाखत

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये, विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

आशिष शेलार विशेष मुलाखत
ASHISH SHELAR

६ ऑगस्ट, २०२४, मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये, महायुतीचे सरकार विधानसभेत येईल का ?, मुंबईतल्या पराभवाची जबाबदारी कुणाची ? कार्यकर्ता विरोधात आणि शेलार पवारांसोबत का?, जरांगेंना शेलारांचा विरोध वरवरचा ?, उद्धव पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ?,  मराठे कुणबी आहेत का?, पोलीस भरतीत मराठ्यांवर अन्याय कुणामुळे? या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. 

काय म्हणाले आशिष शेलार ?

'विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार'
'लोकसभेमुळे भाजपा कार्यकर्ता दुखावलेला'

'मात्र त्याचा परिणाम विधानसभेवर होणार नाही'
'असत्य पसरवून मविआचा विजय' 

'अजित पवार आमच्या सोबतच असणार'
'मिळालेल्या यशात अजित पवारांचेही श्रेय'

'लोकसभेसाठी माझ्या नावाचा विचार नव्हता'
'विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेसाठी मतं मागणार' 

'राज्याची आर्थिक स्थिती उत्तम'
'योजनांचा भुर्दंड करदात्यांवर येणार नाही'

'उद्धव ठाकरेंचे वक्तव्य बेताल, असंस्कृत'
'उद्धव यांचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले'
'त्यांना आता पराभव दिसतोय'

'उद्धव यांचा मित्रपक्षांवर विश्वास नाही'
'काँग्रेसच्या सहवासामुळे उद्धव यांची बेछूट वक्तव्य'
'विरोधकांच्या भाषेत उत्तर देणे आमची संस्कृती नाही' 

'पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही ?'
'पवारांना मराठा आरक्षण देण्याची इच्छा होती का ?' 

'भाजपामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले' 
'उद्धव यांच्यामुळेच मराठा आरक्षण टिकले नाही' 

'मविआला मराठा आरक्षणावरून राजकारण करायचेय'
'आरक्षण प्रश्न मिटवायचा होता तर, सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थि का ?'

'मविआचे अस्तित्व चार-पाच महिन्यांत संपेल'
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही' 

'वरळीमध्येही महायुतीचाच विजय होणार'
'एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात विधानसभा लढणार' 

'मविआत जागावाटपामुळे तणाव'
'लवकरच मविआ फुटणार'

'आर्थिक मागास आरक्षणात मुसलमानांचाच फायदा झाला'
'आरक्षणामुळे दोन समाजात फूट योग्य नाही' 

'मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे'
'मात्र त्यांना आरक्षण देतांना ओबीसींवर अन्याय नको' 


सम्बन्धित सामग्री