मुंबई : मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यालयात घुसून भाजपा कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.
भाजपा कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयात घुसून सोनिया गांधी यांच्या फलकाला काळ फासण्यात आलं आहे. आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. भाजपा युवा कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केला यावर काँग्रेसचे आंदोलन सुरू असतानाच गुरूवारी सायंकाळी भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आझाद मैदानाजवळ असलेल्या प्रदेश कार्यालयात घुसत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाबाहेरील सोनिया गांधी यांच्या पोस्टरला काळे फासण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत तोडफोड करणाऱ्यांना रोखले.
काय आहे प्रकरण?
लोकसभेत भाषणादरम्यान अमित शाह यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. शाह यांच्या भाषणाची मोडतोड करून काँग्रेसकडून एक्स पोस्ट व्हायरल करण्यात आली. काँग्रेसकडून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. अमित शाह यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला. अमित शाह यांच्याविरोधात संसदेत काँग्रेसने आंदोलन केले. दिल्लीत काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपाच्या एका खासदाराच्या डोक्याला दुखापत झाली. त्याप्रकरणावरून मुंबईत भाजपाच्या युवा मोर्चाचे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठामार केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून परस्परविरोधी आरोप होत आहेत.
हेही वाचा : नागपूरातील संविधान चौकात मविआचं आंदोलन