Saturday, December 06, 2025 11:06:06 AM

Bihar Cabinet Formulation: बिहार निवडणुकांनंतर विधानसभा अध्यक्षपदावरून भाजपा आणि जेडीयू आमने-सामनेे

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएच्या बैठका सुरू असून विधानसभा अध्यक्ष पदावर जेडीयू आणि भाजपामध्ये तणाव वाढला आहे.

bihar cabinet formulation बिहार निवडणुकांनंतर विधानसभा अध्यक्षपदावरून भाजपा आणि जेडीयू आमने-सामनेे

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात नवी सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जेडीयू (Janata Dal United) आणि भाजपा (Bharatiya Janata Party) या दोन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी दावा केला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी जेडीयूचे नेते संजय कुमार झा आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह हे सोमवारी रात्री दिल्लीला पोहोचले असून, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे.

मंगळवारी दोन्ही पक्षांच्या विधायी दलांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. या बैठकीत जेडीयू आणि भाजपा त्यांच्या विधायक दल नेत्यांची निवड करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळातील मंत्रीपदांची वाटणी दोन्ही पक्षांमध्ये समान ठेवण्याचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष पद कोणाच्या वाट्याला जाणार यावर दोन्ही पक्ष ठाम आहेत. भाजपाला विधानसभा अध्यक्ष पद कोणत्याही परिस्थितीत स्वतःकडे ठेवायचे असल्याचे कळते. पटना येथे सोमवारी उशिरापर्यंत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. दुसरीकडे, जेडीयूलादेखील हे पद मिळावे अशी इच्छा असून, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान सहयोगी पक्षामधील The Lok Janshakti Party (Ram Vilas) जीतनराम मांझी यांची Hindustani Awam Morcha (Secular) उपेंद्र कुशवाहा यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे.

हेही वाचा:  Zilla Parishad Election: अखेर 'या' तारखेला होणार जिल्हापरिषद निवडणुका; लवकरच होणार अधिकृत घोषणा

सूत्रांचे म्हणणे आहे की या तीनही पक्षांशी सरकार स्थापनेबाबत तत्त्वतः सहमती झाली आहे. बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी भाजपा आणि जेडीयूच्या स्वतंत्र विधायी दलांच्या बैठका होणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी एनडीए (National Democratic Alliance) विधायी दलाची संयुक्त बैठकही होईल. नव्या सरकारचा शपथविधी समारंभ 20 नोव्हेंबर रोजी पटना येथील गांधी मैदानावर आयोजित केला जाणार आहे. सध्याच्या बिहार विधानसभा कार्यकाळात स्पीकर पद तीन वेळा बदलले गेले आहे. सध्या हे पद भाजपाचे नंदकिशोर यादव यांच्याकडे आहे.

याआधी जेडीयू - आरजेडी युतीच्या काळात हे पद राजदचे अवध बिहारी चौधरी यांच्याकडे होते. त्याच्या आधी भाजपा नेते विजय सिन्हा अध्यक्ष होते. परंपरेनुसार, 2020 पूर्वी नितीश कुमार यांच्या जेडीयूने बहुतेक वेळा स्पीकर पद आपल्या ताब्यात ठेवले होते. विधानसभा अध्यक्ष पदाचे राजकीय महत्त्व अधोरेखित करताना नेते म्हणतात की, सरकार अल्पमतात असतानाच्या परिस्थितीत हे पद निर्णायक ठरते. परंतु मजबूत बहुमताच्या सरकारमध्ये हा पदभार पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सन्मानाने स्थान देण्यासाठी वापरला जातो.

हेही वाचा : Maha-Mumbai CNG : मुंबईमधील सीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याचे धक्कादायक कारण समोर! महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा खुलासा


सम्बन्धित सामग्री