Friday, December 05, 2025 02:34:02 AM

Bihar Government Formation : बिहारचा मुख्यमंत्री कोण? भाजपचा मंत्रीमंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) घवघवीत यश मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. जनतेमध्ये सत्तेतील पदांच्या वाटपाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

bihar government formation  बिहारचा मुख्यमंत्री कोण  भाजपचा मंत्रीमंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला

Bihar Government Formation : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) घवघवीत यश मिळवल्यानंतर आता सत्ताधारी गोटात आनंदाचे वातावरण आहे. त्यासोबतच, पुढील सरकार कसे स्थापन करावे आणि मंत्रिपदांचे वाटप कसे करावे, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षातून (BJP) 'समसमान वाटपाचा' (50:50 Formula) प्रस्ताव समोर आला असून, त्यावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या निकालांनी विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. विरोधी पक्षांमध्ये पराभवाच्या कारणांसंबंधी तऱ्हेतऱ्हेचे मुद्दे उपस्थित होत आहेत. असे असताना जनतेमध्ये सत्तेतील पदांच्या वाटपाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

निवडणूक निकाल आणि मंत्रिपदाची उत्सुकता
बिहार विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजप 89 जागांनिशी राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (JDU) 85 जागांसह दुसरे स्थान मिळवले आहे. एनडीएतील इतर घटक पक्षांना लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) ला 19, हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 5 आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला 4 जागांवर विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत (भाजप 74, जदयू 43) भाजपने 22 तर जदयूने 12 मंत्रिपदे घेतली होती. मात्र, आता जदयूने 85 जागा जिंकल्यामुळे मंत्रिपदांचे वाटप कसे होते, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - AAP Post On Bihar Election: बिहार निवडणुकीच्या विजयाचे खरे शिल्पकार कोण? 'आप'ने पोस्ट शेअर करत केला खळबळजनक दावा

सत्तावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
इंडियन एक्स्प्रेसनुसार, भाजपने बिहारमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून, तो जदयूकडे प्रस्तावित केला जाण्याची शक्यता आहे. सोमवारी (आज) जदयूची आणि मंगळवारी भाजपची पक्षीय बैठक होणार आहे, ज्यात या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची चर्चा आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे, त्यापूर्वी म्हणजेच 21 तारखेपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता आहे.
वाटपाचा प्रस्ताव: भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजप आणि जदयू यांना समसमान मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तसेच, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला दोन मंत्रिपदे, तर उपेंद्र कुशवाह (राष्ट्रीय लोक मोर्चा) आणि जितन राम मांझी (हिंदुस्तानी आवाम मोर्चा) यांना प्रत्येकी एक मंत्रीपद असा फॉर्म्युला अस्तित्वात येऊ शकतो.

नितीश कुमारच मुख्यमंत्री, पण उपमुख्यमंत्रीपदावर संभ्रम
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यावर भारतीय जनता पक्षामध्ये एकमत झाले आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपदाबाबत (Deputy CM) भाजपने अद्याप नेमकी नावे निश्चित केलेली नाहीत.
सम्राट चौधरींवर चर्चा: विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर भ्रष्टाचार आणि निवडणूक प्रतिज्ञापत्रात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रशांत किशोर आणि माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, यावर चर्चा सुरू आहे. मात्र, बिहार निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांची नावे घेऊन कौतुक केले होते. यामुळे पक्षातील उच्चपदस्थ नेते त्यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; मक्का ते मदीना जाणारी बस टँकरवर आदळली, 42 भारतीयांचा मृत्यू


सम्बन्धित सामग्री