Friday, March 21, 2025 10:31:52 AM

भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत पनीरबद्दल दिली धक्कादायक माहिती

भाजपा आमदार सातपुते यांनी भेसळयुक्त पनीरच विधानसभेत दाखवून चक्क व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.

भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत पनीरबद्दल  दिली धक्कादायक माहिती

मुंबई :  भाजपा आमदार सातपुते यांनी भेसळयुक्त पनीरच विधानसभेत दाखवून चक्क व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. खोटे आणि खरे पनीर ओळखून दाखवा असे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी म्हटले. कल्पना करा की, तुम्ही खात असलेल्या पनीरमध्ये फक्त शहरी भागातच भेसळ होतेय असं नाही. भेसळीचा हा गोरखधंधा गावखेड्यात पोहोचलाय. तुम्हीच जे पनीर खाताय ते भेसळयुक्त असू शकतं ही भीती अगदी सर्वदूर पसरली आहे. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पनीरचे दोन थोरले तुकडे हातात घेऊन विधान भवनात प्रवेश केला आणि सगळ्यांचे लक्ष वेधले. एक आमदार पनीरमधील भेसळीकडे या निमित्ताने लक्ष वेधू पाहात होता. ही बाब तुमच्या आमच्या जगण्याशी निगडित आहे. प्रथिनांच्या आहारासाठी पनीर खाल्ले जाते. डाळीच्या तुलनेत पनीर स्वस्त असल्याने पसंतीस उतरले आहे.


बनावट पनीर कसं ओळखाल ?
बेसनासोबत पाण्यात उकळल्यास पनीर पाण्याचा रंग गुलाबी होतो.आयोडीनचे काही थेंब टाकताच शिजवलेले पांढरे पनीर रंग बदलते. मऊ आणि दुधाच्या चवीचे पनीर नसेल तर ते बनावट ठरते.

हेही वाचा : शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते; वक्तव्याने वादाला फुटले तोंड
 

दूध भेसळ भारतात सर्रास आढळते. 
अन्नसुरक्षा आणि नियंत्रण प्राधिकरणाचा दूधभेसळीबाबत अहवाल

भारतात 79 टक्के दूध भेसळयुक्त 
भुकटी, पाणी, स्टार्च, ग्लुकोज, जनावरांची चरबी याची दुधात भेसळ
भेसळयुक्त दूध प्यायल्यास आरोग्य बिघडते.
भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास पोटदुखी, मळमळ, उलटी संभवते.

बनावट पनीर कसे बनते ?
दुधाऐवजी वनस्पती तूप, स्टार्च आणि काही रसायने याचे मिश्रण बनवतात. भेसळीच्या मिश्रणात कॉर्नफ्लॉअर मिसळले जाते.भेसळीचे मिश्रण खरे पनीर वाटावे यासाठी युरिया आणि कृत्रिम रंग वापरतात. भेसळीच्या मिश्रणाला गरम करून त्याची लादी बनवतात. गरजेनुसार तुकडे करून हा पदार्थ पनीर म्हणून विकला जातो. 

दूधभेसळ रोखण्याची सरकारवर जबाबदारी मोठी आहे. पण, त्यात सरकारला फारसे यश येताना दिसत नाही.  फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अनॉलॉग चीज च्या नावाखाली आर्टिफिशल पनीर किंवा फेक पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत निर्णय घेऊन फेक पनीर विक्री बाबत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.


सम्बन्धित सामग्री