पुणे : पुण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन होत आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे नेते आणि पदाधिकारीही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या बैठकीत विधानसभेच्या जागांबाबत आढावा घेण्यात आला. मात्र रविवारी होणाऱ्या अधिवेशनात नेमकं काय घडतं आणि केंद्रीय गृहमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.