मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील दुसऱ्या केबल-स्टे पुलाचं उद्घाटन करण्यात आले. रे रोड येथील सहा मार्गिका असलेल्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे.
मुंबईत केबल-स्टे पुलाचं उदघाटन
मुंबईमधील दुसऱ्या केबल ब्रिजचे उदघाटन झाले असून रे रोड येथे बांधण्यात आलेल्या सहा लेनच्या नवीन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आजपासून पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या पुलाच्या बांधकामाला 14 फेब्रुवारी 2022 रोजी सुरुवात झाली होती. ROB ची लांबी 385 मीटर असून त्याला दोन डाऊन रॅम्प्स आहेत. पुलाला एकूण 6 लेन असतील. हा प्रकल्प सुमारे 273 रुपये कोटींच्या खर्चाने पूर्ण होत आहे. प्रारंभी हा पूल नोव्हेंबर 2023 मध्ये खुला करण्याचे नियोजित होते. मात्र काही अतिक्रमणाच्या अडचणींमुळे प्रकल्पाला किंचित विलंब झाला.
हेही वाचा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
रे रोड केबल-स्टे (ROB) सेंट्रल पायलॉन सिस्टीम वापरून तयार केला आहे. ज्यामध्ये ब्रीजच्या मध्यभागी असलेल्या स्पाइन गर्डरवर स्टे केबल्स उभ्या केल्या आहेत. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा पूल मर्यादित पायऱ्यांसह आणि कमी पाया बांधकामासह डिझाइन केला आहे. सेगमेंटल बांधकाम पद्धती वापरण्यात आली आहे.
गुणवत्तेवर अधिक नियंत्रण ठेवता येते आणि बांधकामाचा कालावधी कमी होतो. प्रत्येक सेगमेंट फॅब्रिकेशन यार्डमध्ये तयार करून प्रत्यक्ष जागेवर नेऊन बसवले जातात. सरळ मार्गासाठी स्टील गर्डर सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामुळे काम जलद आणि सोपे होते.