राहुल गांधी आणि कुणाल पाटील
Kunal Patil Join BJP : धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज (मंगळवार) 1 जुलै रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुणाल पाटील यांनी कमळ हाती घेतलं.
कुणाल पाटील यांच्या पक्ष प्रवेशादरम्यान त्यांच्यासोबत धुळे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, विद्यमान सरपंच, उपसरपंच यांचा समावेश आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. तर दुसरीकडं हा प्रवेश उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - Best Breakfast For Diabetes: ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी खा 'हे' 3 सुपरनाश्ते, पचनशक्तीही राहील मजबूत
कुणाल पाटील हे काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही त्यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण मागील काही वर्षांपासून काँग्रेसने उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याची नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. एकेकाळी इंदिरा गांधी प्रचाराची सुरुवात याच भागातून करत असत. पण आज मात्र पक्षाची पकड येथे ढासळलेली आहे, असंही ते म्हणाले.
भाजप प्रवेशानंतर बोलताना पाटील म्हणाले, ‘उत्तर महाराष्ट्राचा आणि माझ्या जिल्ह्याचा विकासाला मी प्राधान्य देईन. मागील दहा वर्षांत भाजपने देशात विकासाचे जे कार्य केले आहे. तसंच राज्यात फडणवीस यांनी विकासाचं नवं चित्र उभं केलंय. त्यामुळं माझ्या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.’
हेही वाचा - एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला; 1 जुलैपासून व्यावसायिक सिलेंडरमध्ये मोठी कपात
आता कुणाल पाटील यांच्या रूपाने भाजपला एक मातब्बर नेत्या उत्तर महाराष्ट्रात मिळाला आहे. यामुळं भाजपची ताकत वाढली आहे.