Friday, April 25, 2025 09:17:26 PM

नितेश राणेंच्या 'मल्हार सर्टिफिकेट'च्या वक्तव्यावरून वाद

बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या वक्तव्यावरून वाद

हिंगोली : बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. मल्हार क्रांती सेनेकडून मंत्री राणे यांचा निषेध करण्यात आला आहे. नितेश राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी मल्हार क्रांती सेनेकडून करण्यात आली आहे. 

मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचे वक्तव्य केल्याने हिंगोलीतील मल्हार क्रांती सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. मंत्री नितेश राणे यांनी चिकन मटण दुकान चालू केल्यास 11 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. राजे मल्हारराव होळकर यांचा अपमान केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी हिंगोलीत मल्हार क्रांती सेनेकडून करण्यात आली आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार?

हिंदू खाटीकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा उपक्रम मंत्री नितेश राणे यांनी काढला होता. मल्हार सर्टिफिकेट असणाऱ्याकडून मटण खरेदी करण्याचेही त्यांनी सांगितले होते. तसेच मटण विक्री करताना हलाल नाही तर झटका पद्धतीने करा असेही त्यांनी सांगितले होते. 

हलाल म्हणजे काय?  
हलाल म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार परवानगी असलेले अन्न आहे. या प्रक्रियेत प्राण्याला कमीत कमी त्रास सहन करावा लागतो. प्राणी बलिदान देताना देवाचं नाव घ्यावं लागते. एकाच प्रहारात धारदार चाकूने मारला जावा. मुस्लिम व्यक्तीने अल्लाहचे नाव घेत कत्तल करावी लागते. 

झटका म्हणजे काय? 
प्राण्याची मान एका झटक्यात वेगळी करणे. मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध केलं जातं जेणेकरुन जास्त वेदना होत नाही. मारण्यापूर्वी प्राण्याला उपाशी ठेवलं जातं. 

मंत्री राणे यांच्या निर्णयावर याआधी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी टिका केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी टिका केली आहे. त्यानंतर आता हिंगोलीतील मल्हार क्रांती सेनेकडून मंत्री राणेंचा निषेध करण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री