बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. अशातच, कारखान्याच्या निवडणुकीत यावर्षी पवार कुटुंबाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांची मागणी:
या दरम्यान, कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते शरद पवारांकडे स्वतंत्र पॅनल उभा करण्याची मागणी केली होती. मात्र, या पॅनलमध्ये नेमकं काय होणार? शरद पवार हे अजित पवार किंवा चंद्रराव तावरे यांच्या पॅनलसोबत जाणार की स्वतंत्र पॅनल उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, आजपर्यंत शरद पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीत कधीही लक्ष घातलं नाही. मात्र, आता शरद पवार कारखान्याच्या निवडणूक लक्ष घालणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रविवारी झालेल्या या बैठकीत युवा नेते युगेंद्र पवार देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. बारामतीच्या राजकारणात ही बैठक नवीन समीकरण निर्माण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या निवडणुकीत शरद पवारांचा निर्णय काय असेल? कोणता पॅनल उभा राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या बैठकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.