मुंबई : मुंबईत भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार विराजमान झाले आहेत. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. कला, क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सर्व क्षेत्रातील दिग्गजांना देण्यात आली होती. या सोहळ्याला अभिनेत्री, अभिनेते, क्रिकेटर, उद्योगपती, साधू संत व महंत उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ 132+5 = 137