मुंबई: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाची जागा छगन भुजबळ यांनी भरली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी रात्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा: आजारपणाचं कारण सांगून विदेशवारी केल्यामुळे अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी - नितेश राणे
बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतरांवर आरोप झाले होते. वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडेंसोबत घनिष्ठ संबंध असल्यामुळे मुंडेंवर देखील आरोप करण्यात आले होते. तसेच, या प्रकरणामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण होऊ लागले. त्यामुळे, धनंजय मुंडेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
जेव्हा, छगन भुजबळांनी मुंबईतील राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली. कारण भुजबळांना मंत्री केल्यानंतर, अशी चर्चा होती की भविष्यात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बऱ्याच वेळेच्या चर्चेनंतर हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवास्थानी गेले होते.
हेही वाचा: हवामान खात्याने दिला मुंबईकरांना इशारा
आठ दिवसांपूर्वीच भुजबळांच्या मंत्रिपदासाठी चर्चा:
आठ दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती. त्यानंतर, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकांमध्ये भुजबळ यांच्या मंत्रिपदावर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भुजबळ यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.