मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा 59 वा वर्धापनदिन सोहळा वरळी डोम येथे पार पडला. या सोहळ्यादरम्यान, शिवसेनेकडून एक टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या टीझरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 'कम ऑन किल मी' असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत म्हणाले, 'मरे हुए को क्या मारना?'.
'कम ऑन किल मी' - उद्धव ठाकरे:
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी या गद्दारांसमोर उभा आहे. कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर'.
हेही वाचा: फडणवीसांनंतर शिंदेंच्या राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली
'मरे हुए को क्या मारना?' - एकनाथ शिंदे:
शिवसेनेच्या 59 वा वर्धापनदिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका करत म्हणाले, 'मी या गद्दारांसमोर उभा आहे. कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर'. उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले, 'मरे हुए को क्या मारना?'.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले', असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे.