Saturday, January 18, 2025 07:22:35 AM

Fadnavis vs Sharad Pawar
शरद पवारांच्या शंकेचं फडणवीसांकडून निरसन

देवेंद्र फडणवीसांनी ट्विटद्वारे शरद पवारांना दिलं प्रतिउत्तर दिलं.

शरद पवारांच्या शंकेचं फडणवीसांकडून निरसन 


 
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विरोधकांकडून बरेच प्रश्न महायुतीला विचारले जात आहेत. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट आणि काँग्रेसच्या तमाम नेत्यांनी निकालावर आक्षेप व्यक्त केला आहे.  ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर ही वेळोवेळी महायुती कडून देण्यात आली आहे. ह्या प्रश्नोत्तराच्या खेळात आता  वरिष्ठ नेते शरद पवारांचे देखील आगमन झाले आहे. शरद पवारांनी निकालाची आकडेवारी आश्चर्यकारक आहेत असं शरद पवार पवार बोलले. पुढे बोलताना ते म्हणले निवडणुकांनंतर राज्यात नेहमीच उत्साही वातावरण निर्माण होते, पण या वेळी महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर ते दिसत नाही. आरोप करणे हे योग्य ठरत नाही कारण माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. प्रत्येक पक्षाने मिळवलेल्या एकूण मतांची आणि निवडून आलेल्या लोकांची आकडेवारी काढली. काँग्रेसला ८० लाख मते मिळाली, पण त्यांना फक्त १५ लोक निवडून आले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री शिंदे यांना ७९ लाख मते मिळाली, म्हणजे काँग्रेसपेक्षा एक लाख कमी, परंतु त्यांचे ५७ लोक निवडून आले. या विरोधाभासावर शरद पवार यांनी ईव्हीएमवरील संशय व्यक्त केला.

            शरद पवारांच्या या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांनी ट्विटद्वारे प्रतिउत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणले श्री शरद पवार साहेब,आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा ? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा.2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री