४ ऑगस्ट, २०२४, मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांची नवी तारीख अखेर समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक २२ सप्टेंबरला होणार आहेत. २५ सप्टेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यांपैकी पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर उर्वरित पाच जागा या एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलया आहेत.