पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
मुंबई: विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची कामगिरी ही निराशाजनक होती. मात्र २० जागा शिवसेना ठाकरे गट जिंकू शकला. या पराभवानंतर ठाकरे गटवर संकटांचं सावट हे येईल यांचं भाकीत सर्वांनीच केलेलं.
पहिली राजन साळवी पक्ष सोडून जाणार अशी बातमी पुढे आली. यावर अनेक चर्चादेखील झाल्या. शेवटी राजन साळवी यांनी स्वतः स्पष्ट केले की ते पक्ष सोडून जाणार नाहीत. राजन साळवी यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चा मंदावल्याच होत्या. त्यात, नवीन बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातील पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पाच नगरसेवक पक्ष सोडून जाणं ही बाब शिवसेना ठाकरे गटासाठी निराशाजनक आहे. यावर अजून ठाकरे गटाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया आली नाहीये.
विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट ही या पाच नगरसेवकांची नावं आहेत
शिवसेना ठाकरे गटाच्या या 5 नागरसेवकांचा मंगळवार (07/01/2025) दुपारी 1.00 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच पुण्यातील सर्व आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात प्रवेश करणार होणार आहे