मुंबई : महाराष्ट्रासाठी आज मोठा दिवस आहे. राज्यात आज नवीन सरकार स्थापन होणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील या शपथविधी सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी खास पगडी बनवण्यात आली आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पगडी तयार करण्यात आली आहे. खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार केली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या नावाची पगडी तयार केल्याची माहिती आहे.
शपथविधीसाठी खास पगडीचे आकर्षण
संत तुकाराम महाराजांच्या पगडीसारखी हुबेहुब पगडी शपथविधीसाठी तयार करण्यात आली आहे. केशरी रंगाची आकर्षक पगडी शपथविधी सोहळ्याचे लक्ष वेधून घेणार आहे. ही पगडी सुती कापडाची आहे. संत तुकाराम महाराज या थीमवर आधारित पगडी तयार करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खास पगडी बनवून घेण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पगडी तयार केली आहे. गुलाबी रंगाची पगडीचे विशेष आकर्षण असणार आहे. महायुतीतील नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी तयार केली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, प्रफुल्ल पटेल, पंकजा मुंडे या नेते मंडळींसाठी पगडी तयार करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँगेसच्या एका कार्यकर्त्याच्या मागणीनुसार या पगड्या तयार करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.