Wednesday, January 15, 2025 05:41:14 PM

Chitra Wagh
'अजून किती माती करून घेणार उद्धवजी..?'

भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे सेनेवर टीका केली आहे.

अजून किती माती करून घेणार उद्धवजी

मुंबई : भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे सेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदुवर होत असलेल्या अत्याचारावर भाष्य केले आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर मोदींनी भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.भाजपाला हिंदुत्वाची व्याख्या कळायला हवी असी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम वाघ यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपविला असा टोलाही त्यांनी राऊतांनी लगावला आहे. अजून किती माती करून घेणार असा सणसणीत टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला..!

संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपविला..!

अजून किती माती करून घेणार उद्धवजी..?

 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केले होते. त्याच पार्श्वभूमीवर वाघ यांनी उद्धव यांचा समाचार घेतला आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री