Saturday, January 25, 2025 08:38:06 AM

Prakash Ambedkar
येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर......

येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर

मुंबई : परभणीत एका व्यक्तीकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची तोडफोड करण्यात आली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच भारतीय संविधानाची तोडफोड करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?  

परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर केलेली भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचितचे परभणी जिल्हा कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी होते आणि त्यांच्या निषेधामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि एकाला अटक केली. मी सर्वांना विनंती करतो की कायदा सुव्यवस्था राखावी. येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील!!!

जय भीम

 

परभणीतील घटना काय ?

परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाची एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आणि त्यांनी दुकानाबाहेरील साहित्य आणि गाड्यांची तोडफोड करण्यास सुरूवात झाली. त्याचबरोबर जाळपोळ करण्यास सुरूवात झाली. या घटनेला हिंसक वळण लागले.

जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक देखील करण्यात आली. परभणी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांनी दुकानं आणि वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलक आणि पोलिस आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री