संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. यावेळी जरांगे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तातडीने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असं आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना दिलं आहे. ही मदत तातडीनं करा अशी अपेक्षा यावेळी जरांगे यांनी व्यक्त केली.