शिर्डी : अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची गर्दीतून एका कार्यकर्त्याने मागणी केली. भाषणाच्या सुरूवातीलाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केल्याने बेशिस्त कार्यकर्त्यावर जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चिडले. त्यानंतर जयंत पाटील भाषण सोडून मागे फिरले. अमित भांगरे , जिल्हाध्यक्ष संदिप वर्पे यांनी विनंती केल्यानंतर जयंत पाटलांनी भाषणास सुरूवात केली. मी येथे फक्त उमेदवाराची घोषणा करण्यासाठी आलो नाही. असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या.