Saturday, January 25, 2025 08:58:43 AM

Khoskar is aggressive about the poor food
आश्रम शाळेतील निकृष्ट जेवणाबाबत खोसकर आक्रमक

नाशिकमधील आश्रम शाळांमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

आश्रम शाळेतील निकृष्ट जेवणाबाबत खोसकर आक्रमक

नाशिक : नाशिकमधील आश्रम शाळांमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला आणि किडलेले कडधान्य वापरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांशी जीवघेणा खेळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मुंडेगावातील सेंट्रल किचनची आमदार हिरामण खोसकरांकडून अचानक पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे उघड झाले. 

हेही वाचा : जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना नोटीस
 

आश्रम शाळेतील सेंट्रल किचनची पाहणी आ्मदार खोसकर यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट होता. या जेवणाबाबत आमदार हिरामण खोसकर आक्रमक झाले. आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी जाब विचारला. ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना हप्ता दिला जात असल्याचा आरोप यावेळी खोसकरांनी केला. 

हेही वाचा : नौदलात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
 

नाशिकमधील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या दिल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्य बिघडू शकते. हा प्रकार आमदार हिरामण खोसकर यांनी समोर आणला आहे. आमदार खोसकर यांनी आश्रम शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांबरोबर झालेला प्रकार पुढे आला आहे. यानंतर खोसकरांनी अधिकाऱ्यांना घेरलं आहे. त्यांना फोन करून या प्रकाराविषयी जाब विचारला. तसेच मंत्रालयात बैठक घेऊन दोषींचे निलंबन करणार असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. 


सम्बन्धित सामग्री