Tuesday, March 17, 2026 03:14:29 PM

Kishori Pednekar : भूषण गगराणी यांच्या नियुक्तीला ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा कडाडून विरोध; म्हणाल्या, 'सुरूवातच अशी...'

kishori pednekar  भूषण गगराणी यांच्या नियुक्तीला ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या सुरूवातच अशी

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत आज, बुधवारी महापौर आणि उपमहापौर निवडीचा निकाल लागला असून महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतून प्रशासक राजवट संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे, विरोधी बाकांवरील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे कोणताही विरोध नसल्याने ही निवडणूक 'बिनविरोध' पार पडली. परंतू ठाकरेसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी मनोमत व्यक्त करताना अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. शिवाय किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निवडीवर आक्षेप घेतला. नव्या नियमानुसार भूषण गगराणी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याला किशोरी पेडणेकर यांनी कडाडून विरोध केला आहे. 

हेही वाचा : SUBT On BMC Mayor: ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले; उपमहापौर संजय घाडींच्या निवडीवर ठाकरे गटाचा जोरदार निषेध


सम्बन्धित सामग्री