महाराष्ट्र: महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात आवडती आणि प्रसिद्ध योजना ठरली. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु आता लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं देखील समोर आलाय. त्याचअनुषंगाने आता अपात्र लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणारे. सरकारने अपात्र लाडक्या बहिणीचे अर्ज देखील बाद केले आहेत. त्यातच ज्या लाडक्या बहिणींनी नियमात बसत नसतानाही लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई करा असं वक्तव्य महायुतीच्या नेत्याने केलंय. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या संदर्भांत हे वक्तव्य केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची योजना आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाच नाही पाहिजे. त्यामुळे या महिलांचे अर्ज रद्द होतील. त्या महिलांवर गुन्हेदेखील दाखल होतील, असंही त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील 5 लाख 92 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातील 25 हजार लाडक्या बहिणींना नियमांत न बसतानाही लाभ घेतला आहे. त्यामुळे 25 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले आहे.
याआधीही नियमांत न बसतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई करण्यात आले असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले.लाडकी बहीण योजनेत बनावट कागदपत्र वापरुन लाभ घेण्याचा प्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे सप्टेंबर महिन्यातच निर्दशनास आला. याबाबत ऑक्टोबर महिन्यात पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जांची तपासणी केली जाणार आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.