महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीचा आरोप करत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत मुंबईत नुकताच 'सत्याचा मोर्चा' काढला.
या मोर्चादरम्याने राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांवरून प्रश्न उपस्थित केले. यावरुनच आता भाजपानेही 'सत्याचा मोर्चा' मधील राज ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ लावत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - Local Body Election Maharashtra: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा? येत्या 72 तासांत होऊ शकते मोठी घोषणा
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, "काही जण मतदारांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही उत्तर देऊ. आम्हाला दिसून आलं ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत जो काही झटका लागला, तेव्हा दिल्लीतील पप्पूपासून ते गल्लीतील पप्पूपर्यंत सर्वजण जी भूमिका मांडत आहेत.
हेही वाचा - Maharashtra Olympic Associaction Election : मोठी जबाबदारी, अध्यक्षपदाची धुरा आता अजित पवारांकडे
पुढे ते म्हणाले की, "राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदार तुम्हाला दिसले नाहीत का? असा सवाल शेलार यांनी केला. सत्याचा मोर्चात राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचा उल्लेख करताना म्हणताना कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी या मतदारसंघांचा उल्लेख केला", असे म्हणत आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
त्याचप्रमाणे आशिष शेलार यांनी वर्षा गायकवाड, संदीप क्षिरसागर, वरूण सरदेसाई आणि जयंत पाटील यांच्या मतदारसंघाबद्दलदेखील माहिती दिली. मुस्लीम दुबार मतदाराबद्दल तुमची भूमिका वेगळी आहे. हा वोट जिहाद आहे. राज आणि उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही. तसेच 31 विधानसभा मतदारसंघात मुस्लीम दुबार मतदारांची संख्या दोन लाख 26 हजार 791 आहे. लोकसभेला तुम्ही वोटचोरी केली असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा का?," असा सवाल शेलार यांनी केला.