उदय साबळे. प्रतिनिधी. मुंबई: 'गरीबांच्या खिचडीवर जगणांऱ्यानी आम्हाला बोलून दाखवू नये', मंत्री नितेश राणेंनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर घणाघात टीका केली आहे. 'गरिबांचे पैसे आणि गरिबांच्या खिचडीसाठी आलेले पैसे स्वतःच्या मुलीच्या अकाउंटमध्ये फिरवणाऱ्या संजय राऊत यांनी आमच्या संदर्भात तर बोलूच नये', असा टोला मंत्री नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा: सोनिया गांधी यांची बिघडली तब्येत; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
काय म्हणाले नितेश राणे?
'गरिबांचे पैसे आणि गरिबांच्या खिचडीसाठी आलेले पैसे स्वतःच्या मुलीच्या अकाउंटमध्ये फिरवणारा नालायक हा संजय राजाराम राऊत यांनी आमच्यावर काहीच बोलू नये. गरिबांच्या खिचडीवर जगणारा तू नालायक आणि कार्टा आहेस त्यामुळे आमच्यावर बोलू नका', असा टोला मंत्री नितेश राणेंनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांना लगावला आहे.