Saturday, March 07, 2026 04:57:53 AM

Akshata Tendulkar Ambulance Controversy : भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर?, सायरन सुरू ठेवून...

दादर मार्केटमध्ये सायरन सुरू ठेवून रुग्णवाहिका फिरवण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे.

akshata tendulkar ambulance controversy  भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर सायरन सुरू ठेवून

दादर मार्केट परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करताना भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर  यांनी रुग्णवाहिकेचा  बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप केला जात आहे. रुग्ण नसताना आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना गर्दीच्या दादर मार्केटमध्ये सायरन सुरू ठेवून रुग्णवाहिका फिरवण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते दिसून आले. त्यामुळे भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - Swing Ride Accident : मोठी दुर्घटना! झोपाळा तुटून पोलीसाचा मृत्यू, अनेकजण जखमी, नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. आपत्कालीन सेवांचा असा वापर केल्यास सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो, अशी टीका होत आहे. आता या प्रकरणात अक्षता तेंडूलकर यांच्यावर काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री