BMC Election Ward Reservation: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2025) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईकरांच्या सर्वाधिक प्रतिक्षेतील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला असून, यंदा देखील पारदर्शकतेसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय सोडत काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपला असून, गेल्या जवळपास तीन वर्षांपासून मुंबई महापालिका प्रशासकाच्या नियंत्रणाखाली आहे. आता आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे पडघम खऱ्या अर्थाने वाजले आहेत.
मुंबई महानगरपालिकेची रचना:
एकूण प्रभागसंख्या – 227
महिलांसाठी राखीव जागा – 114
अनुसूचित जातींसाठी राखीव – 15 (त्यापैकी महिलांसाठी 8)
अनुसूचित जमातींसाठी राखीव – 2 (महिलांसाठी 1)
ओबीसीसाठी राखीव – 61 (महिलांसाठी 31)
सर्वसाधारण प्रवर्ग – 149 (महिलांसाठी 74)
अनुसूचित जाती (SC) आरक्षण:
मुंबई महापालिकेतील 15 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 26, 93, 146, 152, 155, 147, 118, 133, 140, 141, 151, 186, 183, 189 आणि 215 हे प्रभाग समाविष्ट असून त्यापैकी अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.
अनुसूचित जमाती (ST) आरक्षण:
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 53 आणि 121, ज्यापैकी 121 क्रमांकाचा प्रभाग महिलांसाठी राखीव आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण:
मुंबईतील 61 प्रभाग ओबीसीसाठी राखीव असून यातील 31 प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. या यादीत 6, 10, 33, 41, 49, 52, 63, 69, 70, 72, 76, 80, 82, 85, 87, 91, 95, 100, 105, 108, 111, 113, 117, 129, 136, 137, 150, 153, 158, 167, 176, 182, 187, 193, 195, 198, 208, 219, 222 आणि 226 यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Municipal Corporation Election Reservation: नाशिक, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत जाहीर
सर्वसाधारण (Open) व सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण प्रवर्गातील 149 प्रभागांपैकी 74 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 2, 8, 17, 28, 31, 44, 51, 60, 73, 79, 94, 101, 110, 124, 142, 163, 172, 175, 180, 197, 212, 220, 224, 227 आणि इतर प्रभागांचा समावेश आहे. उर्वरित 75 प्रभाग सर्वसाधारण (Open) प्रवर्गासाठी खुले आहेत.
हेही वाचा - Cabinet Meeting Decision : बँका, न्यायालये आणि शेती विकासासाठी फडणवीस सरकारचे मोठे निर्णय!
आरक्षण सोडतीनंतर प्रत्येक पक्षाची निवडणूक रणनीती ठरवली जाणार असून, उमेदवारांच्या चर्चांनाही वेग येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील निवडणुकीचा बिगुल वाजल्याने शहरात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे.