मुंबई : मविआची मुंबईत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झालीच नाही. मविआमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा लढायच्या आहेत. उद्धव यांचाही सर्वाधिक जागा लढण्याचा आग्रह आहे. राशपचा मोक्याच्या जागांवर डोळा आहे. मित्रपक्षांसाठी सोडायच्या जागा ठरत नाहीत. मविआत परस्परावर विश्वास नसल्याचे चित्र दिसून येत आहे.