Friday, June 13, 2025 07:02:57 PM

'इम्तियाज जलील यांना अटक करा'

एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.

इम्तियाज जलील यांना अटक करा

छत्रपती संभाजीनगर : एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. जलील यांच्या मुंबईतील प्रभातफेरीदरम्यान छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काळे फासल्याचा आरोप केला जात आहे. या प्रभातफेरीचे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर  हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.  विविध पोलीस ठाण्यांसमोर आंदोलन केली जात आहेत. याचदरम्यान इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. 

 


सम्बन्धित सामग्री