मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची स्पष्टता मिळाल्यावर मुंबईतील आझाद मैदानावर अवघ्या काही तासातच शपथविधी होणार आहे अशातच आज आज भरत गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा वेळ मर्यादित असल्यामुळे फक्त तिघांच्या शपथविधीचा कार्यक्रम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेअभावी एकाच वेळी सर्व मंत्र्यांचा शपथविधी होणे शक्य नव्हते. त्यामुळे उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी 11 तारखेला होईल.
केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होणार आहे. इतर मंत्री कोण असतील याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.याशिवाय, शिवसेनेला किती मंत्री पद मिळतील यांची चर्चा तीनही मंत्र्यांमध्ये सुरु आहे .आणि आम्हा सर्वांचा शिंदेंवर विश्वास आहे. शिंदे जे काही निर्णय घेतील ते पक्षहितासाठी असतील. त्याचबरोबर, एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात रहावं ही सर्व आमदारांची इच्छा. अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली.
दरम्यान, भरत गोगावले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली आहे.
- संजय राऊत यांनी बोलतच राहावं कारण ते जे बोलतात त्यांच्या नेहमी उलट होतं...
- कोण संपेल आणि कोण राहिल ते जनतेने आणि महायुतीच्या विजयाने दाखवलं आहे...
- संजय राऊत यांनी डोळे झाकले आहेत...
- विरोधकांना सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे येणं न येण हा त्यांचा प्रश्न आहे...