Wednesday, July 09, 2025 09:53:04 PM

UDDHAV THACKERAY: उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ व्हायरल

भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला. अशातच, शीतल म्हात्रे यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ शेअर केला.

uddhav thackeray उद्धव ठाकरेंच्या जय गुजरात घोषणेचा जुना व्हिडिओ व्हायरल

मुंबई: शुक्रवारी पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे कौतुक केले. यादरम्यान, अमित शहा यांचे कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी अनेक विशेषणे आणि उपमा वापरली होती. मात्र, भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'. एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला. अनेक राजकीय नेत्यांनी एकनाथ शिंदेंवर टीकेचा वर्षाव केला. अशातच, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. 

 

 

शुक्रवारी सकाळी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी इंस्टाग्रामवर उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे घोषणा करताना म्हणाले की, 'आप आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'. यावर अनेक वापरकर्त्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'गुजरात मध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी जय गुजरात बोललेलं आहे ते मॅडम'. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, 'आज शिंदे साहेब बोलले त्याला लाचारी नाही का म्हणायचे प्रत्येक वेळेस स्वतःच्या चुका लपवायला दुसऱ्याकडे बोट नाही करायचे'.


सम्बन्धित सामग्री