Saturday, January 25, 2025 08:50:38 AM

Pankaja Munde
पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांकडून मागितले वचन; मुंडेंच्या जयंतीनिमित्त केलेली पोस्ट चर्चेत

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती जवळ आली असल्याने पंकजा मुंडे यांनी त्यासंबंधी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांकडून मागितले वचन मुंडेंच्या जयंतीनिमित्त केलेली पोस्ट चर्चेत

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळाच ठसा उमटवणारे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे  यांची 12 डिसेंबर रोजी जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर त्यांना अभिवादन करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. गोपीनाथ मुंडेंच्या जयंती जवळ आली असल्याने पंकजा मुंडे यांनी त्यासंबंधी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.

पंकजा मुंडे यांनी एक्स पोस्टमध्ये गोपीनाथ गडावर 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त मराठवाड्यातील अभूतपूर्व यशाबद्दल महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्कार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गोपीनाथ गडावर बोलावून त्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्याची इच्छा होती. परंतु शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे ते होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर्षी गोपीनाथ मुंडे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करणार असल्याचा निर्णय पंकजा यांनी घेतला असल्याचे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

पंकजा मुंडेंनी केलेली पोस्ट  

मराठवाड्यातील अभूतपूर्व यशाबद्दल महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्कार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गोपीनाथ गडावर बोलावून 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त सत्कार आणि अभिनंदन करण्याची माझी इच्छा होती. परंतू शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे हे होऊ शकत नाही. असा जंगी कार्यक्रम मी नंतर भविष्यात घेईलच. परंतु सध्या मुंडे साहेबांची जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. 12 डिसेंबरला मी सकाळी 11 वा. गोपीनाथ गडावर येईल. सकाळी 11 ते दुपारी 2 वा. दरम्यान गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील. ज्यांना यादिवशी यायला जमणार नाही. त्यांनी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आपापल्या गावांमध्ये, आपल्या वाॅर्डामध्ये मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी व त्यांना अभिवादन करावे. आणि मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचे वचन मला द्यावे.

 

पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेंची जयंती बीडमधील गोपीनाथ गडावर साजरी होणार आहे. यावर्षी ही जयंती साध्या पद्धतीने करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच ज्या कार्यकर्त्यांना जयंतीदिवशी गोपानाथ गडावर यायला जमणार नाही. त्यांनी आपापल्या पद्धतीने मुंडेंना अभिवादन करावे आणि मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचे वचन मला द्यावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

 


सम्बन्धित सामग्री