Saturday, June 14, 2025 04:41:53 AM

'राहुल गांधींना आत्मपरीक्षण आणि अभ्यासाची गरज'; बावनकुळेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी घणाघात टीका केली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केले.

राहुल गांधींना आत्मपरीक्षण आणि अभ्यासाची गरज बावनकुळेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

मुंबई: नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी घणाघात टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवण्यासाठी भाजपने ''मॅच-फिक्सिंग'' केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल करत म्हणाले की, 'स्वतःचे अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी, थोडे आत्मपरीक्षण करा'. 

हेही वाचा: 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

'राहुल गांधी म्हणतात की महाराष्ट्रात फक्त 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ ''संशयास्पद'' आहे. पण राहुलजी, तुम्हाला 2009 मध्ये काय घडले ते आठवते का? जर नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो', असा सवाल बावनकुळेंनी केला आहे. 

नुकताच, शनिवारी राहुल गांधींनी केलेल्या महाराष्ट्रातील 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या मत घोटाळ्यावर बावनकुळे म्हणाले की, 'एप्रिल 2009 मध्ये, लोकसभा निवडणुकीदरम्यान, 72.9 दशलक्ष नोंदणीकृत मतदार होते. ऑक्टोबर 2009 पर्यंत, विधानसभा निवडणुकीदरम्यान, ही संख्या 75.9 दशलक्ष झाली होती. याचा अर्थ फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदारांची वाढ झाली. त्या वेळी, तुम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास होता का? की काँग्रेस-कमिशन युती खेळत होती? त्यावेळी तुम्हीच फेरफार करण्यात सहभागी होता का? कृपया उत्तर द्यावे'. 

पुढे बावनकुळे म्हणाले की, 'जेव्हा 2004 आणि 2009 या काळात तुमची सत्ता जिंकली होती, तेव्हा तुम्हाला शंका नव्हती. पण आता, जेव्हा तुमचा सत्ता हारली, तसेच महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला नाकारल्यानंतर तुम्ही ओरडण्यास सुरुवात केली आहे. राहुलजी, निवडक आकडे वाचून देशाची दिशाभूल करणे थांबवा. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी, थोडे आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारले आहे आणि लवकरच बिहारमधील लोकही तुम्हाला हाकलून लावतील. म्हणूनच तुम्ही तुमच्या येणाऱ्या पराभवाची सबब सांगण्याचा प्रयत्न करत आहात'.


सम्बन्धित सामग्री