मुंबई: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत आहेत. वरुण सरदेसाई आणि नांदगावकरांच्या गुप्त भेटी होत आहेत. त्यामुळे मनसे-ठाकरे युतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांणा उधाण आले आहे. मनसे- ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये सध्या गुप्त बैठका होत आहेत. वरुण सरदेसाई आणि नांदगावकरांमध्ये गुप्त भेटी झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाईंमध्येही 4 वेळा चर्चा झाल्याची समोर आली आहे.
हेही वाचा: राणेंनी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले...; गोगावलेंचे खळबळजनक विधान
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी मनसे-ठाकरे गटात हालचाली सुरु झाल्या आहेत. ठाकरे-मनसे युतीसाठी मागील महिनाभरात हालचालींना वेग आला आहे. वरून सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यात दोन ते तीन गुप्त भेटी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर संदीप देशपांडे आणि वरून सरदेसाई यांच्यात चार वेळा सविस्तर चर्चा झाली आहे. 2017 मध्ये युतीची सूत्रं बाळा नांदगावकर-संदीप देशपांडे यांच्या हाती होती. यंदाही तेच चेहेरे सक्रिय असणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनसे-ठाकरे गटातल्या नेत्यांच्या गुप्त बैठका होत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी दोन्ही बाजूंनी पडद्यामागून चाचपणी चालू आहे. दोन्ही गटांत नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र मागील महिनाभरापासून बैठका सुरू आहेत.