डहाणू शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी अपहरण झाल्याचा आरोप केला आहे आणि पोलिस ठाण्यात गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा तपास सुरू नाही, अशी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या ताज्या वृतांतासह शहरात खळबळ उडाली आहे.
डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अशोक धोडी यांच्या खाजगी ब्रिजा कारचा मागोवा घेतला आहे. 20 तारखेला सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी ब्रिजा कार भरधाव वेगात जात असताना एक इको गाडी देखील दिसते. एक किलोमीटर अंतरावर झाई बोरीगाव घाट रस्त्यावर कार आडवून धोडी यांचे अपहरण करण्यात आले, असे सांगण्यात येत आहे.
कुटुंबीयांनी पोलिसांना काही संशयीतांची नावे दिली असून, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी या प्रकरणात तपासाचा वेग वाढवण्याची मागणी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.