मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर नव्या सरकारची सुरूवात झाली आहे. मात्र सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत असल्याने मंत्र्यांना शिपाई आणि चोपदार यांची कमतरता भासणार आहे. सामान्य प्रशासन विभागात 1998 पासून या पदांवरील भरती झाली नाही. या पदांसाठी कंत्राटी पध्दतीने भरती केली असली तरी त्यांना विविध कामे दिल्यामुळे मंत्री कार्यालायात शिपायांची वानवा असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
सामान्य प्रशासन विभागात 1998 पासून भरती नाही
1998 पर्यंत विभागाकडे या पदावर 120 जण कार्यरत होते.
सेवानिवृत्त झाल्यामुळे आता शिपाई पदावरील केवळ 30 कर्मचारी उरले
सामान्य प्रशासन विभागाकडून कंत्राटी पद्धतीने 40 शिपायांची भरती
मात्र, त्यांना विविध कामांची जबाबदारी
मुख्यमंत्र्यांना 2 जमादार, एक चोपदार आणि एक शिपाई दिले जातात
प्रत्येक मंत्र्यांना एक चोपदार, एक नाईक आणि एक शिपाई दिले जातात
नवे सरकार आले तरी या पदांवर नियुक्त्या नसल्याने त्यांची उणीव भासणार
अधिवेशन काळात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी पक्षाला ८ तर विरोधी पक्षाला ८ अशा एकूण १६ शिपायांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येते. पांढरे कपडे, पांढरी टोपी असा पेहराव करून त्यांना सभागृहाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात.