Wednesday, February 12, 2025 03:25:53 AM

Balasaheb Thackeray Jayanti
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ठाकरेंचा अंधेरीत तर शिंदेंचा बीकेसीत मेळावा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ठाकरेंचा अंधेरीत तर  शिंदेंचा बीकेसीत मेळावा

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.  याचे औचित्य साधत शिवसेना आणि ठाकरे गट या  दोन्ही पक्षांनी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीतील छत्रपती श्रीशिवाजी महाराज क्रीडा संकुलात, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे. दोन्ही ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. आगामी पालिका निवडणुकांचे बिगुल या मेळाव्यातून फुंकले जाणार असल्याने दोन्ही नेत्यांनी या मेळाव्यांना विशेष महत्व दिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवास ठाकरे गटाच्या मेळाव्यात पुन्हा उलगडला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना जबर धक्का बसला. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला देखील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या विजयाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आनंद द्वीगुणीत झाला आहे. पुन्हा सत्तेत बसल्यावर शिंदे आपली राज्यातील ताकद पुन्हा एकदा आगामी निवडणुकीच्या निमित्ताने दाखवणार असल्याने शिवसेनेच्या बीकेसी मैदानात होणाऱ्या मेळाव्याची जोरदार तयारी शिंदे समर्थकांनी केलीय.

हेही वाचा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना भारतरत्न द्या; खासदार राऊतांनी केली मागणी

बाळासाहेबांचे विचार आणि वारसा हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांना त्यांच्या अस्तित्वाची लढाई आता जिंकायची असल्याने दोन्ही पक्षांनी आपापल्यापरिने ताकद लावली आहे. आज होणारे मेळाव्यात मांडल्या जाणाऱ्या मुद्यांवर भविष्यात राजकीय धुरळा उडणार आहे. 


सम्बन्धित सामग्री