मुंबई : आज देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षी सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी प्रजासत्ताक दिनाची थीम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजावतरण करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी ध्वजावतरण केलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजावतरण पार पडले. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले.
हेही वाचा : Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा
राज्यघटना लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशभर उत्साह पाहायला मिळत आहे. याच प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवास्थानी ध्वजावंदन केले आहे. त्यांनी तिरंग्याला सलामी दिली. महाराष्ट्र पोलिस दलाकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आले आणि त्यानंतर देशाच्या राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.