Saturday, January 25, 2025 08:12:38 AM

Viral Video of best bus driver taking alcohol
चालकाने बस थांबवून घेतली दारू अन्.... मनसेकडून व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील अंधेरी पश्चिमधील ओशिवरा भागात बेस्ट चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून शेअर करण्यात आला आहे.

चालकाने बस थांबवून घेतली दारू अन् मनसेकडून  व्हिडीओ  व्हायरल

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिमधील ओशिवरा भागात बेस्ट चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून शेअर करण्यात आला आहे. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी बेस्ट बस चालकाचा दारू घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मनसेने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये बेस्ट बसचे कर्मचारी किती गंभीर आहेत याची प्रचिती येते.

बेस्टचा बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. तिथून दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसला. महत्त्वाचं म्हणजे त्या बसमध्ये प्रवासी बसल्याचं दिसतंय. हा प्रकार अत्यंत भयंकर आहे. मनसेच्या संदेश देसाई यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे. बेस्टचे ड्राईव्हर मुंबईकरांचा काळ बनवतायत....! सरकार मात्र फक्त मृतांना मदत जाहीर करतंय, पण दारू पिऊन बस चालवणाऱ्या या बेस्ट चालकांचं काय करणार ? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

 

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर प्रवासी आणि पादाचाऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कंत्राटी कामगाराच्या चुकीमुळे सात जणांचा बळी गेल्यामुळे बेस्ट प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुर्ला अपघाताच्या प्रकरणाला 24 तास उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ अंधेरी भागातून समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बसचा चालक प्रवाशांनी भरलेली बस भररस्त्यात थांबवून वाईन शॉपमध्ये जाताना दिसत आहे. त्यानंतर दारु खरेदी केल्यानंतर बसचा चालक बस चालवत जाताना दिसत आहे.

 

सध्या कुर्ल्यात घडलेली घटना आणि आता अंधेरी भागातून समोर आलेली घटना बघून बेस्ट प्रशासनाच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. बेस्ट चालकांना प्रवाशांच्या जीवाची काही पडली की नाही असे ताशेरे बेस्ट प्रशासनावर ओढले जात आहेत.

 


सम्बन्धित सामग्री