छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेनंतर आता पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या खासदार पदावरील विजयानंतर रिक्त होत असलेल्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष दावा सांगत आहेत. सर्वाधिक लीड दिल्याचे दाखले देत हा दावा सांगितला जात आहे.शिवसेनेचे संजय शिरसाट या पदसाठी आग्रही आहेत. रिक्त झालेले पालकमंत्री पद कोणत्या पक्षाला मिळाले याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.