बुलढाणा : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या दोन गटात काही दिवसांपूर्वी सभागृहातच तुफान राडा झाला. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आ. चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर मलकापूरचे भाजपा नेते शिवा तायडे यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला . प्रत्युत्तर म्हणून दोन्ही गट सभागृहातच भिडले यावेळी पोलिसांसमक्षच हा राडा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. याचा व्हिडिओ आता समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बाजार समिती निवडणूकीदरम्यान दोन गट एकमेकांना भिडले. सभापती निवडणुकीत भाजपाचे दोन गट परस्परांमध्ये भिडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांचे संजय काजळे सभापती निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. त्यानंतर मलकापूरचे भाजपा नेते शिवा तायडे यांच्या गटाने संचेती यांच्या गटावर हल्ला केला. सभागृहातच दोन गट एकमेकांमध्ये भिडले. पोलिसांसमोरच हा राडा झाला. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या राड्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
हेही वाचा : पर्यटन मंत्रालयाकडून महाकुंभ 2025 साठी प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ