पुणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : पुण्यात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलिसांची हुज्जत घातली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाहनांची तपासणी करत होते. या दरम्यान पोलिसांनी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी अडवली आणि वाहनाची तपासणी केली. पुण्यातील शनिवार वाडा परिसरात पोलिस त्यांच्या वाहनाची तपासणी करत होते. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस आमदार असल्यामुळे अडवलं जात असल्याचे म्हटले. यशोमती ठाकूर यांनी यावेळी पोलिसांशी गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.