पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरीतील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेचे म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शंशाक हगवणे फरार असतानाच राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; वैष्णवीच्या मामांनी केली अजित पवारांकडे विनंती
काय म्हणाले अजित पवार?
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या लग्नाला अजित पवार उपस्थित असल्याचे फोटो समोर आले आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या मुलाच्या लग्नासाठी वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून मागण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या चाव्या अजित पवार यांनीच दिल्याचे समोर आले आहे. 'माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही', असं अजित पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा: राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे; वैष्णवी हगवणे यांच्या आईची मागणी
वैष्णवीच्या मामांची प्रतिक्रिया:
यावेळी, वैष्णवीच्या मामांनी म्हणजेच उत्तम बहिरट यांनी हगवणे कुटुंबियांवर आरोप करत म्हणाले की,' वैष्णवी हगवणेचा संशयास्पद मृत्यू हा हुंडाबळीचाच प्रकार आहे'. पुढे उत्तम बहिरट म्हणाले की, 'वैष्णवी आणि शंशाक हगवणे यांच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे आता तरी त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा', अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागणी केली आहे. 'वैष्णवीचं प्रेमविवाह असल्यामुळे त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सर्वांचा तीव्र विरोध होता. परंतु वैष्णवी माझ्याकडे माझ्याजवळ येऊन म्हणायची की, ''मला शशांकसोबत लग्न करायचे आहे''. हगवणे कुटुंबीयांनी तिच्यावर जादू केली होती आणि तिला पूर्णपणे आपल्या वशमध्ये केले होते. म्हणूनच ती ऐकायला तयार होत नव्हती. शेवटी तिने शशांकसोबत लग्न केले आणि लग्नाच्या सहा महिन्यानंतर, जेव्हा हळूहळू या सर्व गोष्टी घडू लागले, तेव्हा वैष्णवी मला म्हणाली की, 'मामा, मी चूक केली'.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; वैष्णवीच्या मामांनी केली अजित पवारांकडे विनंती
मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल:
वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे यांचे पुत्र शशांक हगवणे यांच्या लग्नातले व्हिडिओ समोर आले आहे, ज्यामुळे अजित पवारांवर टीकेचा वर्षाव होत आहे. या लग्न सोहळ्याला स्वत: अजित पवार उपस्थित होते. मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या फॉर्च्युनरची चावी अजित पवारांनीच शशांकच्या हातात दिल्याचे फोटोही समोर आले आहे. अशातच, मनसेनं अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच, शालिनी ठाकरे यांनी देखील 'अजित पवार राजीनामा द्या' असं एक्सवर पोस्ट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.