संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवीन घडामोडी हाती येताय. याप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप देखील होताय. दरम्यान बीड पोलीस दलात उलथापालथ झाली असून चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याय. त्यातच आता या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरा स्पष्टच बोलले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडचे जवळचे संबंध असलेल्या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलीय. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आऱोपी गुजरातमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोपी कुठेही गेले असतील आणि मदत केली असतील तरी त्यांच्यावर कारवाई होतेय तुम्हाला दिसतेय. मदत करणाऱ्यालाही आम्ही सोडत नाही. या संदर्भात नीट चौकशी होऊ दयावी. आम्ही कुठल्यागी दोषीला सोडणार नाही,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नागपूरमध्ये भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान सूरू आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण बीड प्रकरणात सरकार पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे. निर्धाराने कारवाई होणार आहे. या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही वाचू देणार नाही. या प्रकरणात जे दोषी आहे. जे जे दादागिरी करतात, हप्ते वसुली करतात त्या सगळ्यांवर जरब बसवायला सूरूवात केली आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत.