Wednesday, June 18, 2025 03:00:33 PM

'नरकातला स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात तपास यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर आणि ईडीने विरोधकांवरील कारवाईवर भाष्य केले.

नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) पक्षप्रमुख शरद पवार यांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात तपास यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर आणि ईडीने विरोधकांवरील कारवाईवर भाष्य केले. चला तर सविस्तर जाणून घेऊया काय म्हणाले जेष्ठ नेते शरद पवार.

काय म्हणाले शरद पवार?

'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ईडीच्या विरोधकांवरील कारवाई यासंदर्भात बोलताना जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, 'संजय राऊत यांनी काय केलं होतं? सामन्यामध्ये ते नियमितपणे आपली कठोर भूमिका मांडतात. मात्र त्यांची कठोर लेखणी काही लोकांना पचत नव्हती. त्यामुळे ते अस्वस्थ होते आणि केवळ संधीची वाट पाहत होते. मात्र, पत्राचाळ प्रकरणाने त्यांना संधी दिली होती', असे जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

हेही वाचा: 'पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर...'; जावेद अख्तरांनी कुणाला सुनावलं?

'पत्राचाळीत कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक तिथे राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यांनी त्या चाळकरी लोकांना घरे देण्याची मागणी केली. त्यांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लेखनामुळे दुखावलेल्या सरकारी यंत्रणेला संधी मिळाली', असे शरद पवार म्हणाले. 'या प्रकरणात ईडीचे योगदान सर्वाधिक आहे. ईडीने केलेल्या केसमध्ये संजय राऊतांचा कोणताही संबंध नसताना त्यांना गुंतवले गेले. जिथे अन्याय आणि अत्याचार होतात तिथे संघर्ष होतो. आपल्या सर्वांना असे वाटते की सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे, ते नेहमीच त्याविरोधात लिहितात', असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, 'काही लोक महाराष्ट्रात चुकीचे काम करत होते. हे माहित असूनही त्यांच्या विरोधात कोणती कारवाई होत नव्हती. खासदार म्हणून संजय राऊतांनी देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात, अशा लोकांकडून पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला कळवले होते', असं शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, 'त्या प्रकरणात, 30 ते 35 लोक होते, कंपन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले होते, ही रक्कम सुमारे 58 कोटी होती. जेव्हा ही माहिती संजय राऊतांकडे आली तेव्हा त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात दिली होती. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. मात्र त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्याबद्दल पुस्तक लिहिण्यात आले आहे'.


सम्बन्धित सामग्री