Saturday, February 08, 2025 06:12:23 PM

Which MLAs of NCP party took the oath
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई : नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हसन मुश्रीफ यांनी सर्वप्रथम मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते आहेत. 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024 साली कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले आहे. मुश्रीफांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा मुस्लिम चेहरा समजले जाते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा जन्म  १९७५ साली परळी येथे झाला. मुंडे यांच्यावर  भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख आणि युवा मोर्चाचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. 1995 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 2010-13 आणि  2013-16 मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणून काम केले आहे. 2016 साली विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद भूषविले आहे.

तसेच दत्तात्रय भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतील.  2014, 2019 आणि 2024 विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले आहे. अदिती तटकरे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला नेतृत्व म्हणून अदिती यांच्याकडे पाहिले जाते. 2019 साली श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.  ठाकरे सरकारमध्ये त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. शिंदे सरकारमध्ये महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच नरहरी झिरवाळ यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.  

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची यादी

 

  1. हसन मुश्रीफ
  2. धनंजय मुंडे 
  3. दत्तात्रय भरणे
  4. अदिती तटकरे
  5. माणिकराव कोकाटे
  6. नरहरी झिरवाळ
  7. मकरंद जाधव पाटील
  8. बाबासाहेब पाटील
  9. इंद्रनील नाईक

सम्बन्धित सामग्री