Wednesday, June 18, 2025 03:48:29 PM

गोकुळच्या अध्यक्षपदावर आज होणार शिक्कामोर्तब; बंद लिफाफ्यात होणार अध्यक्षाचं नाव सादर

अध्यक्ष अरुण डोंगळेंनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदावर आज होणार शिक्कामोर्तब बंद लिफाफ्यात होणार अध्यक्षाचं नाव सादर

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव एकमताने निश्चित झाल्याची चर्चा असतानाच, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत महायुती अध्यक्ष झाली पाहिजे आणि संचालकांनी एकजूट राहिली पाहिजे, असा संदेश देताच, अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाली.

हेही वाचा: आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये लपले आहे विजेत्याचे नाव

बंद लिफाफ्यात होणार अध्यक्षाचं नाव सादर:

राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी गोकुळच्या राजकारणात रस घेतल्याने गोकुळचे राजकारण पुन्हा एकदा बदलले आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष कार्यालयात नवीन अध्यक्ष निवडीवर अडीच तास चर्चा झाली. यानंतर, नवीन अध्यक्षाचे नाव काढण्यात आले असून माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे हा ड्रॉ देण्याचा निर्णय झाला आहे, आणि अध्यक्षाचे नाव ३० मे रोजी उघडकीस होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा: 'बाधित झालेल्या इतर सर्व भागांसाठी एक पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची मागणी...'; राहुल गांधींनी लिहिले मोदींना पत्र

नवीद मुश्रीफ यांच्या नावाचीही चर्चा सुरू:

यादरम्यान, शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाला अप्रत्यक्ष विरोध झाल्यामुळे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, याचा निकाल ३० मे रोजी दुपारीच स्पष्ट होईल. त्यामुळे, जर नवीद मुश्रीफ अध्यक्ष झाले तर ते महायुतीचे अध्यक्ष असतील. नवीद मुश्रीफ परदेशातून लगेचच कोल्हापुरात आल्यापासून त्यांच्या नावाची चर्चा अधिक प्रमाणात होत आहे.

तर दुसरीकडे, जिल्हा बँकेतील अध्यक्षांच्या कार्यालयात अडीच तास बैठक झाल्याने बराच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे यासह जवळपास सर्व नेते जिल्हा बँकेत आले होते. यावेळी त्यांनी अध्यक्षांच्या दालनात नवीन अध्यक्षांविषयी चर्चा केली. गोकुळचे सर्व संचालकही उपस्थित होते. तसेच, बैठकीचा कालावधी वाढल्यामुळे संचालकही अस्वस्थ झालेले दिसले.


सम्बन्धित सामग्री