मुंबईत टूरिझम सेक्स रॅकेटची पोलखोल

मुंबई: मुंबईत टूरिझम सेक्स रॅकेटची पोलखोल करण्यात आलीय.वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केलीय. या दोघींच्या तावडीतून पोलिसांनी २ मुलींची सुटकाही केलीय. गुन्हे शाखेच्या झोन ७ च्या पोलिसांनी ही कारवाई केलीय.या प्रकरणी अबरून अमजद खान ऊर्फ सारा आणि वर्षा दयालाल परमार या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईत वेश्याव्यवसायावर कारवाई होत असल्यामुळे ग्राहकांबरोबर मुलींना गोव्यात पाठवणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केलीय.